Sign In now, Let's start your Grocery Shopping. Don't have an account? Sign Up Now
Come join the Green Life! Let's set up your Account.
टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड, Science & Technology Park Pune approved by DST, Govt. of India व रयत शिक्षण संस्था यांच्यामध्ये सामंजस्य करार झालेला आहे. त्यानुसार तीन संस्थांच्या माध्यमातून संस्थेमध्ये खालीलप्रमाणे 4 ठिकाणी Center for Invention, Innovation and Incubation (CIII) केंद्रे उभारली जात आहेत.
No | Center Name | Address |
1. | Rayat Centenary -Center for Invention, Innovation and Incubation (RC-CIII). | Rayat Research Centre, Plot No.72-C, Sector 11, Kharghar, Navi Mumbai. |
2. | Karmaveer Bhaurao Patil- Center for Invention, Innovation and Incubation (KBP-CIII) | Rayat Shikshan Sanstha's Northern Regional Office, Behind Hotel Imperial, Burudgaon Road, Ahmednagar, Pin-414001. |
3. | Laxmibai Bhaurao Patil -Center for Invention, Innovation and Incubation (LBP-CIII). | S.M.Joshi College, Hadapsar, Dist-Pune. |
4. | Yashwantrao Chavan - Center for Invention, Innovation and Incubation (YC-CIII). | Yashwantrao Chavan Institute of Science, Satara, Dist-Satara. |
रयत शिक्षण संस्था – टाटा टेक्नॉलॉजी – Science & Technology Park यांच्या मार्फत सुरु होत असलेल्या Center for Invention, Innovation and Incubation (CIII) ची उद्दिष्टे खालीप्रमाणे आहेत.
भारत सरकारच्या NITI आयोगाद्वारे देशातील नवसंशोधन व इन्क्यूबेशनसाठी प्रोत्साहन देण्याकरिता विशेष योजना सुरु केलेली असून Atal Incubation Center ही योजना राबवली जात आहे. या योजनेतून जागतिक दर्जाचे इन्क्यूबेशन सेंटर उभी करण्याचा शासनाचा मानस असून या योजनेतही रयत शिक्षण संस्थेने पुढाकार घेतला असून संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, वाशी आणि यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स, सातारा या दोन महाविद्यालयांद्वारे अटल इन्क्यूबेशन सेंटर योजनेचे प्रस्ताव NITI आयोगाकडे सादर करण्यात आलेले आहेत.
संस्थेच्या विविध महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असणारा उच्चशिक्षित व स्किल्स अंगी असलेला प्राध्यापक वर्ग, स्पेशलायझेशन, कॉलेजमधील साधनसुविधा, उपलब्ध संधी आणि गरजा यांचा विचार करून A+ ग्रेड असणा-या ६ महाविद्यालयांमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स सुरु करण्याचे नियोजन केले असून सायन्स, इंजिनीअरिंग, कला, बँकिंग, व्यवस्थापन, शेती, व्यापार इत्यादी क्षेत्रांतील प्रगत माहिती व प्रशिक्षण देणारे आणि त्या त्या क्षेत्रात प्रगत संशोधन करणारी केंद्रे स्थापन करण्याच्या दृष्टीने नियोजनबद्ध उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे.
No | College Name | Centre of Excellence |
1. | Chh. Shivaji College, Satara. | |
2. | Dhananjayrao Gadgil College of commerce, Satara. | |
3. | Karmaveer Bhaurao Patil College, Vashi.Navi Mumbai. | |
4. | Karmaveer Bhaurao Patil Mahavidyalaya, Pandharpur. | |
5. | Sadguru Gadage Maharaj College, Karad. | |
6. | Yashvantrao Chavan Inst, of Science, Satara. |
विद्यापीठ व उच्च शिक्षण संस्थांद्वारे संशोधनास चालना देण्यासाठी विद्यापीठ व आंतर विद्यापीठ स्तरावर संशोधन महोत्सवाचे आयोजन केले जाते. तथापि या उपक्रमामध्ये रयत शिक्षण संस्थेतील विद्यार्थी पुढे यावेत व भविष्यातील उत्तम संशोधन कार्य त्यांच्याकडून व्हावे याकरिता रयत अविष्कार संशोधन प्रकल्प ४० महाविद्यालयांमध्ये सुरु करण्यात आलेला आहे. या प्रकल्पामधून संस्थेच्या विविध महाविद्यालयांतील हुशार व संशोधन अभिवृत्ती असणा-या विद्यार्थ्यांना निवडून त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य या प्रकल्पाद्वारे केले जात आहे. त्यासाठी संस्थेकडून महाविद्यालयांना रु.१००००/-ची आर्थिक मदत करण्यात येते.
विद्यापीठामार्फत घेण्यात येणा-या अविष्कार महोत्सवामध्ये जिल्हास्तरावर ३०, विद्यापीठ स्तरावर १७ विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळालेली आहेत व राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेमध्ये ५ विद्यार्थी सहभागी झालेले आहेत.
संस्थेमार्फत रयत मध्यवर्ती अविष्कार प्रकल्प घेण्यात येतो. त्यामध्ये ४० महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक सहभागी होतात.
संस्थेतील विविध इन्स्पायर स्कॉलरशिप मिळणारे विद्यार्थी व बी.एस्सी.भाग १, २ व ३ मधील गुणानुक्रमे प्रत्येकी १० विद्यार्थी निवडून अशा विद्यार्थ्यांना संशोधनाकडे वळवण्यासाठी रयत इन्स्पायर प्रकल्पांतर्गत समाविष्ट विज्ञान कार्यशाळा, व्याख्यानाचे कार्यक्रम, विज्ञान प्रदर्शन इत्यादीचे आयोजन करून मार्गदर्शन केले जात आहे. हा प्रकल्प संस्थेच्या २० महाविद्यालयांमध्ये सूरु आहे. या प्रकल्पाद्वारे पुढील कार्य केले जात आहे.
रयत शिक्षण संस्थेतील विद्यार्थी व प्राध्यापकांनी उत्तम दर्जाचे संशोधन करून पेटंट मिळविण्याइतपत उंचीचे संशोधन करावे यासाठी हा स्वतंत्र प्रकल्प सुरु करण्यात येत असून, विद्यार्थी व प्राध्यापकांनी Innovation Research and Incubation यांच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेचा नावलौकिक वाढवावा आणि संशोधनाच्या माध्यमातून समाजासमोरील विविध प्रश्न आणि समस्यांची सोडवणूक करावी आणि रयत शिक्षण संस्थेतून पेटंटेबल (Patentable) संशोधन कार्य व्हावे. यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या उपक्रमाचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विविध नाविन्यपूर्ण प्रकल्प संस्थेमार्फत राबविण्यात येत आहेत. रयत विज्ञान परीषदेचा एक भाग म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या विद्यालय, उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय, द्विलक्षी अभ्यासक्रम, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांकडून व्यावहारिक जीवनामध्ये उपयोगी पडतील अशा पद्धतीच्या आयडिया (संकल्पना) मागविण्यात येत आहेत.
व्यावहारिक जीवनामध्ये उपयोगी पडतील अशा नाविन्यपूर्ण आयडिया (संकल्पना) संस्थेच्या तज्ज्ञ कमिटीकडून छानणी करून गुणानुक्रमे निवडण्यात येतील. त्यानुसार निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या आयडियासाठी संस्थेच्या Seed capital मधून आर्थिक मदत देण्यात येईल. तसेच सदर विद्यार्थ्याला त्याची आयडिया संस्थेच्या Innovation Centre च्या माध्यमातून विस्तार करून पूर्णत्वास नेण्यात येईल व त्याचे पेटंट मिळविण्यापर्यंतची मदत करण्यात येईल.
© 2018 रयत शिक्षण संस्था,सातारा. सर्व अधिकार अधीन | डिझाईन आणि डेव्हलपमेंट (कर्मवीर विद्याप्रबोधिनी रयत शिक्षण संस्था,सातारा)